एकेकाळी बुट पॉलिश करणारा सनी झाला ‘इंडियन आडयल 11’ चा विजेता

रियालिटी शो इंडियन आयलडच्या 11 व्या सीझनची ट्रॉफी सनी हिंदुस्तानीने आपल्या नावावर केली आहे. या ट्रॉफी सोबतच सनीला टाटा अल्ट्रोज कार आणि 25 लाख रुपये बक्षीस मिळाले.  या विजयानंतर सनीला आता हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळेल.

मुळचा पंजाबच्या बठिंडा येथील असलेला सनी इंडियन आयडलमध्ये येण्याआधी बुट पॉलिश करण्याचे काम करत असे. तर त्याची आई फुगे विकण्याची कामे करत असे.

सनीने एकदा सांगितले होते की, अनेकदा परिस्थिती अशी यायची की दुसऱ्याच्या घरी तांदूळ मागावे लागत असे. हे पाहून खूप वाईट वाटायचे.
गरीबशी झगडणाऱ्या सनीच्या आवाजाचे या शोदरम्यान अनेक चाहते झाले. कार्यक्रमाच्या जजेसने देखील त्याच्या आवाजाचे कौतूक केले आहे. एवढीच नाही तर त्याचे गाणे ऐकताना नुसरत फतेह अली खान यांची आठवण येते, असेही म्हटले जाते.

https://www.instagram.com/p/B8627coHFiE/?utm_source=ig_web_copy_link

सनीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्याने कधीच संगीताचे पारंपारिक शिक्षण घेतले नाही. गाणी ऐकत ऐकत तो शिकत गेला.
कार्यक्रमाच्या एका भागा दरम्यान त्याने सांगितले होते की, लहानपणी त्याने पहिल्यांदा नुसरत फतेह अली खान यांचे ‘वो हटा रहे हैं परदा’ हे गाणे एका दर्ग्यात ऐकले होते. हे गाणे ऐकून त्याला रडू आले व तेव्हापासूनच त्याला गाण्याची आवड निर्माण झाली.

https://www.instagram.com/p/B86s95BHSMJ/?utm_source=ig_web_copy_link

सनीने कार्यक्रमादरम्यानच कंगना राणावतचा चित्रपट ‘पंगा’साठी गाणे गायले होते. हे गाणे त्याने शंकर महादेवन यांच्यासोबत गायले होते. हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले होते.

Leave a Comment