आकाशात चक्क 3,280 फूट उंचीवर या पठ्ठ्याने केला डान्स

पश्चिम फ्रान्सच्या चेटेलेरॉल्ट येथे 26 वर्षीय रॅमी ऑवरार्ड या पठ्ठ्याने चक्क हॉट एअर बलून (फुग्यावर) उभे राहून प्रवास करण्याची कामगिरी केली आहे. हा फुगा समुद्र सपाटीपासून तब्बल 3,280 फूट उंचीवर उडत होता. या फुग्यावर संतुलन कायम ठेवण्यासाठी रॅमीला यश आले.

Image Credited – Bhaskar

आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॅमीने या फुग्यावर डान्स देखील केला. यासोबतच त्यांनी जागतिक विक्रम केला आहे. या फुग्याला रॅमीचे वडील उडवत होते. चँलेजला अधिक आव्हानात्मक करण्यासाठी त्यावर एक मेटलची खुर्ची देखील ठेवण्यात आली होती.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, हॉट एअर फुग्यावर उभे राहण्याचा कोणताही विक्रम आतापर्यंत नाही. मात्र 2016 मध्ये स्काय ड्रिफ्टर्स हॉट एअर बॅलूनिंगद्वारे पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फुग्यावरती उभा राहताना दिसत आहे.

Leave a Comment