अरेच्चा ! हा व्यक्ती तब्बल 32 वर्षांपासून दररोज खात आहे ‘फास्ट फूड’

जेवणात एखादा पदार्थ तुम्ही किती दिवस खाऊ शकता ? तुमचे उत्तर असेल 2-4 दिवस, अथवा जास्तीत जास्त 10 दिवस. मात्र बेल्जियममधील एक व्यक्ती तब्बल 32 वर्षांपासून रात्री जेवताना एकच पदार्थ खात आहे. बेल्झियम येथील फ्लेमिश ब्रेबेंट प्रांतातील 45 वर्षीय रुडी गिबेल्स तब्बल 32 वर्षांपासून दररोज रात्री जेवताना केवळ फ्राइज आणि हॉट डॉग खात आहे. मात्र तरी देखील त्यांचे आरोग्य अगदी व्यवस्थित आहे. रुडीला असा कोणताही आजार झालेला नाही, जो इतरांना फास्ट फुड खाल्ल्यामुळे होतो.

मात्र याबाबतीत डॉक्टरांचे मत वेगळे असून, त्यांच्यानुसार रुडीला याचे वाईट परिणाम होत नसतील, मात्र प्रत्येकासोबत असे होणे शक्य नाही.

रुडीनुसार, लहानपणी त्याची आई त्याला जेवताना फळे आणि भालेभाज्या खाण्यास सांगत असे. हे जेवण केल्यानंतरच त्याला रात्री जेवताना फ्राइज आणि हॉट डॉग मिळत असे. हळहळू हे खाण्याची सवयच लागली.

रुडीने सांगितले की, दोन वर्षांपुर्वी फ्लू झाल्याने तो बाजारात जाऊन फ्राइज आणि हॉट डॉग आणू शकला नव्हता. केवळ त्याच दिवसात तो या फास्ट फूड पासून लांब होता.

रुडीच्या या सवयीबाबत एंटवर्प यूनिवर्सिटीचे प्रमुख आहारतज्ञ मायकल सेल्स यांनी सांगितले की, रुडीच्या या सवयीमुळे असे समजू नये की जंक फूड खाल्याने आरोग्यावर काही परिणाम होत नाही. यामुळे मधुमेह, कोलोस्ट्रॉल आणि ह्रदयाचे आजार होऊ शकतात. रुडीला काही आजार झाला नाही याचा अर्थ असा नाही की कोणावरही याचा परिणाम होणार नाही.

Leave a Comment