जाणून घ्या मॉडेल ते फर्स्ट लेडीपर्यंतच मेलानिया ट्रम्प यांचा प्रवास

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोन दिवसीय भारतीय दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष आहे. या संपुर्ण दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत मेलानिया या देखील असणार आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

एका लहानशा देशातून मॉडेल म्हणून पुढे येऊन अमेरिका सारख्या महासत्ता असलेल्या देशाची फर्स्ट लेडी बनण्या पर्यंतचा मेलानिया यांचा प्रवास रंजक आहे.  मेलानिया या ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलानिया यांचा जन्म 1970 ला स्लोवेनिया येथे झाल असून, त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केले होते.

Image Credited – businessinsider

मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची 1998 मध्ये एका फॅशन वीक पार्टीमध्ये भेट झाली होती. ट्रम्प यांना त्यावेळी रिअल एस्टेट मुघल म्हणून ओळखले जात असे.  डोनाल्ड ट्रम्प यांची मेलानियाशी भेट झाली त्यावेळी ट्रम्प यांचा त्यांची दुसरी पत्नी मार्ला मेपलशी घटस्फोट होणार होता. त्यावेळी ट्रम्प याचे वय 52 वर्ष आणि मेलानिया यांचे वय 28 वर्ष होते.

मेलानिया आणि ट्रम्प यांचे नाते त्यावेळी अमेरिकेत चर्चेचा विषय ठरले होते. अखेर दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी मेलानिया यांना 1.5 मिलियन डॉलरची हिऱ्याची अंगठी घालत लग्नाची मागणी घातली होती.

Image Credited – businessinsider

2005 मध्ये ट्रम्प आणि मेलानिया यांच्या लग्नाला बिल गेट्स आणि हिलरी क्लिंटन सारखे अनेक लोक उपस्थित होते. वर्ष 2006 मध्ये मेलानिया यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

Image Credited – famebytes

वर्ष 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ट्रम्प अमेरिकेचे 45वे राष्ट्रपती आणि मेलानिया प्रथम महिला झाल्या. सत्ते आल्यापासून ट्रम्प यांनी 23 देशांचा दौरा केला आहे. भारत दक्षिण आशियातील दुसरा देश आहे.

Image Credited – Aajtak

डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात प्रथम इवाना यांच्याशी लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत. इवानाला घटस्फोट दिल्यानंतर ट्रम्प यांनी मार्ला मॅप्लसशी दुसरा विवाह केला. मार्ला यांना देखील घटस्फोट देत अखेर ट्रम्प यांनी मेलानिया यांच्याशी लग्न केले.

Leave a Comment