एकेकाळी ट्रम्प यांच्याकडे देखील होता स्वतःचा ‘ताजमहाल’

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारत दौऱ्यात जगप्रसिद्ध ताज महालला देखील भेट देणार आहेत. 24 फेब्रुवारीला अहमदाबाद येथील कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते ताजमहालाला भेट देणार आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ट्रम्प यांच्याकडे देखील स्वतःचा एक ताजमहाल होता. याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – casino.org

अमेरिकेच्या न्यूजर्सी राज्यातील अटलांटिक सिटी येथे ‘हार्ड रॉक हॉटेल अँड कसिनो अटलांटिक सिटी’ नावाने एक हॉटेल आणि कसिनो आहे. या हॉटेलला ‘ट्रम्प ताजमहाल’ नावाने देखील ओळखले जाते. हा अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध कसिनो पैकी एक आहे. या कसिनोला 1990 मध्ये 100 कोटी डॉलर खर्च करून उभारण्यात आले होते.

Image Credited – News18

अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प हे मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या वडीलांकडून त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली आहे. 2 एप्रिल 1990 ला ट्रम्प यांच्या या कसिनोचे काम पुर्ण झाले होते. तेव्हा हा जगातील सर्वात मोठा कसिनो होता. खास गोष्ट म्हणजे या कसिनोचे इनोग्रेशन ट्रम्प यांनी स्वतः केले होते.

Image Credited – News18

तब्बल 24 वर्ष हे कसिनो सुरळीत सुरू होते. अखेर 2014 मध्ये आर्थिक अडचणींमुळे 2016 ला हे कसिनो बंद करण्यात आले. मात्र 1 मार्च 2017 ला सेमिनोल ट्राइब ऑफ फ्लोरिडाने हार्ड रॉक इंटरनॅशनल ब्रँड अंतर्गत कसिनो पुन्हा सुरू केले.

Image Credited – vanityfair

हा आकाराने अमेरिकेतील सर्वात मोठा कसिनो आहे. जवळपास 15 हजार वर्ग मीटरमध्ये उभारलेल्या या कसिनोमध्ये 1900 पेक्षा अधिक खोल्या आहेत. याच्या प्रवेशद्वारावर घुमटासारखी आकृती आहे.

Leave a Comment