ट्रम्प यांच्या स्वागतासाठी साकारली 3डी रांगोळी आणि पेंटिंग

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आज भारतात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीयांनी जोरात तयारी केली आहे. पंजाब, गुजरातपासून ते तामिळनाडूपर्यंत लोकांनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पेंटिंग बनवली आहे.

गुजरातमधील सुरत येथे ट्रम्प यांच्या स्वागतासाठी कलाकारांनी ट्रम्प आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी 3डी रांगोळी बनवली आहे. ज्यावर ‘नमस्ते ट्रम्प’ लिहिण्यात आलेले आहे.

अमृतसरचे पेटिंग आर्टिस्ट जगजोत सिंह रुबल यांनी ट्रम्प यांची 10 फूट लांब आणि 7 फूट रुंद पेटिंग बनवली आहे. रुबल यांना ही पेटिंग बनविण्यासाठी 20 दिवस लागले. रुबल यांचे इच्छा आहे की या पेटिंगला अमेरिकेच्या आर्ट गॅलेरीमध्ये प्रदर्शित करण्यात यावे.

तामिळनाडूच्या थेनी येथे फ्रुट कार्व्हिंग कलाकार एम. एलंचेजियन यांनी  टरबूजवर ट्रम्प आणि मोदी यांचा फोटो कोरला आहे.

गुजरातच्या अहमदाबाद येथे मोदींच्या 10 वर्षी फॅन शिवांगी शर्माने देखील पेटिंग काढली आहे. पेटिंगची थीम यू (यूएसए) अँड आय (इंडिया) आहे.

Leave a Comment