हा होता जगातला पाहिला कॅमेरा फोन


फोटो सौजन्य भास्कर
सॅमसंगने नुकताच त्यांचा गॅलेक्सी एस २० अल्ट्रा फाईव्ह जी फोन भारतात सादर केला असून त्याला १०८ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. याच क्षमतेचा कॅमेरा असलेला फोन शाओमी मिक्स अल्फा नावाने लवकरच बाजारात आणत आहे. आज कॅमेरा फोन ही फारशी नवलाची बाब नाही कारण बाजारात आता पाच कॅमेरे असलेले फोनही उपलब्ध आहेत.

मात्र २० वर्षापूर्वी फोन मध्ये कॅमेरा असू शकतो अशी कल्पना कुणी केली नव्हती. जपानच्या क्योवेरा कंपनीने पहिला कॅमेरा फोन व्हीपी -२१० या नावाने बाजारात आणला होता. हा पहिला कलरफोनही होता. या फोनवरून कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या बाळाचा फोटो प्रथम क्लिक केला गेला होता. त्यापाठोपाठ जपानच्याच शार्प कंपनीने जे- एसएचओजी मध्ये व्हीजीए कॅमेरा असलेला फोन बनविला आणि येथूनच कॅमेरा हे फोनचे महत्वाचे अंग बनले.


१९९९ ते २०२० या काळात फोन आणि कॅमेरे दोन्हीतही अमुलाग्र बदल झाले. आताच्या स्मार्टफोन मध्ये कॅमेराची फोटो क्वालिटी अतिशय उत्तम असून फोन आणि कॅमेरा या कॉम्बीनेशनने जबरदस्त क्रांती घडविली आहे. परिणामी डिजिटल कॅमेरा मार्केटला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. डिजिटल कॅमेरा प्रथम १९५१ मध्ये बाजारात आला आणि त्यानंतर दरवर्षी त्याची विक्री झपाट्याने वाढत गेली.

२००९ मध्ये १२.१ कोटी डिजिटल कॅमेरे विकले गेले होते तर त्याचवर्षी कॅमेरा फोनची विक्री ३५ कोटी फोन इतकी होती. २०१५ मध्ये हे प्रमाण २.५ कोटी डिजिटल कॅमेरे आणि १४७.२ कोटी कॅमेरा फोन असे होते. २०१९ मध्ये अवघे १ कोटी डिजिटल कॅमेरे विकले गेले आहेत. २०१० पासून बहुतेक सर्व फोन कॅमेरासह विकले जात आहेत.

Leave a Comment