हा पृथ्वीवरचा स्वर्गच, पण येथे जिवंत राहणे अवघड


फोटो सौजन्य कॅच न्यूज
आपल्या पृथ्वीवर असलेल्या सर्वात सुंदर ठिकाणी आपण एकदातरी भेट द्यावी असे प्रत्येकाला वाटते. जगात स्वर्ग म्हणता येतील अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. याच पृथ्वीवर अशीही एक जागा आहे की तिच्या सौंदर्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. पण या ठिकाणी कुणीही फार काळ जिवंत राहू शकत नाही. जगातील ८७ लाख जिवंत प्रजातीपैकी कुठलीच प्रजाती येथे जिवंत राहू शकत नाही. येथे मुबलक पाणी आहे, डोंगर आहेत पण येथे राहणे दुरापास्त आहे.

युरोपीय संशोधकांनी जगातील या सर्वात सुंदर जागेचा शोध लावला आहे. येथे हिवाळ्यातील तापमान उणे ४५ डिग्री पर्यंत जाते आणि येथील वातावरण मंगळ ग्रहाप्रमाणे आहे. आफ्रिका महाद्विपातील इथिओपिया येथे ही स्वर्गभूमी आहे. येथील पाण्यात, हवेत अॅसिड, मीठ आणि विषारी वायू आहेत आणि येथे पीएच व्हॅल्यु निगेटिव्ह आहे. त्यामुळे येथे जीवन फुलू शकत नाही.


या भूमीत मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम आहे. येथील सरोवरात छोटे ज्वालामुखी असून त्यातून वर्षभर विषारी वायू, रसायने बाहेर पडत असतात. त्यामुळे येथील जमीन रंगीबेरंगी झाली असून हे दृश्य आकर्षक दिसते. या जागेला डलोल जिओथर्मल फिल्ड असे म्हटले जाते. या भूमीत जगातील सर्व रंग दिसतात. येथून जवळच एक गाव आहे मात्र २००५ पासून ते ओसाड बनले आहे. २००५ नंतर येथे कुणीही राहत नाही. संशोधक, फोटोग्राफर या जागेला अनेकदा भेट देतात आपण तेही तेथे मुक्काम टाकू शकत नाहीत.

Leave a Comment