मिसाईलमॅन डॉ. कलाम याना अनोखी श्रद्धांजली


फोटो सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया
भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन आणि थोर शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम याना चेन्नईत रविवारी अनोखी श्रद्धांजली दिली गेली. त्यासाठी ३० बेकारी तज्ञांनी एकत्र येऊन कलाम यांची प्रतिमा असलेला प्रचंड केक बनविला. या केकची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये केली गेली आहे.

डॉ. कलाम यांनी २०२० मध्ये भारत जगात सुपरपॉवर बनेल असे स्वप्न पहिले होते. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली देताना २०२० किलोचा हा प्रचंड केक बनविण्याचा निर्णय घेतला गेला होता. चेन्नईच्या कत्टूपक्कम येथे केक वर्ल्ड डायरेक्टर लॉरेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली हा केक ३० बेकर्सनी तयार केला. त्यासाठी ५०० किलो मैदा, ६५० किलो साखर आणि १६ हजार अंडी वापरली गेली. २५ बाय ३१ मीटर असा या केकचा आकार आहे.

कलाम यांची प्रतिमा असलेला इतका मोठा केक प्रथमच बनविला गेला असून यावेळी कलाम यांचा भाचा एपीजे शेख सलीम व अन्य प्रतिष्ठित उपस्थित होते.

Leave a Comment