दिल्लीच्या अल्ट्रापॉश भागात अडाणी ग्रुपने ४०० कोटीत खरेदी केला बंगला


फोटो सौजन्य पत्रिका
दिल्लीतील अल्ट्रापॉश भाग अशी ओळख असलेल्या लुटीयान झोन मध्ये १०० वर्षे जुना बंगला लिलावात अडाणी ग्रुपने ४०० कोटीत खरेदी केला आहे. या बंगल्याचा लिलाव जाहीर झाला तेव्हा त्यात इन्फोसिसचे नारायण मूर्ती, दालमिया ग्रुप, हॅवल्स ग्रुप असे नामवंत उद्योजक घराणी त्याच्या खरेदीसाठी प्रयत्नशील होती असे समजते. भगवानदास रोड वर असलेला हा बंगला प्रथम आदित्य इस्टेटसच्या मालकीचा होता. या कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरु झाल्यावर देशातील काही नामवंत ग्रुप व उद्योगपती बोली लावण्यासाठी पुढे आले होते.

काही वर्षापूर्वी या बंगल्याची किंमत १ हजार कोटीहून अधिक सांगितली जात होती. नॅशनल लॉ ट्रिब्युनलने १४ फेब्रुवारीला अडाणी ग्रुप कंपनीच्या अडाणी प्रॉपर्टीजच्या ४०० कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दिवाळखोरी प्रोसेस सुरु झाल्यावर या बंगल्याची किंमत २६५ कोटी ठरविली गेली होती. अडाणी ग्रुपला या बंगल्याच्या खरेदीसाठी ५ कोटीची गॅरंटी आणि १३५ कोटी कन्व्हर्जन चार्जेस द्यावे लागणार आहेत.

हा बंगला ३.४ एकर जागेत असून तो दुमजली आहे. २५००० चौरस फुटाचे बांधकाम केले गेले आहे. त्यात ७ बेडरूम, ६ डायनिंग हॉल आहेत. नोकरांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. १०० वर्षापूर्वी या बंगल्याची मालकी ब्रिटिशांकडे होती आणि तेव्हा येथे विदेश विभाग होता. त्यानंतर १९२१ मध्ये युनायटेड प्रोविंस लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य लाला सुखबीर सिन्हा यांनी तो विकत घेतला होता आणि १९८५ मध्ये आदित्य इस्टेटसने या बंगल्याची खरेदी केली होती.

Leave a Comment