…यामुळे डॉक्टर घालतात पांढरा कोट


असे म्हणतात की भल्या माणसाने हॉस्पिटल आणि कोर्टाची पायरी चढू नये. पण आपण जर आजारी पडलो तर आपल्या हॉस्पिटल नक्कीच गाठावे लागते आणि तेथे गेल्यावर आपल्यासमोर पाढरा कोट आणि गळ्यात स्टेथेस्कोप अडवलेली एक व्यक्तीसमोर उभी रहाते. आपल्या आरोग्याची काळजी घेणार देव म्हणजे डॉक्टर… पण हे डॉक्टर नेहमी पांढरा कोट का घालतात हे तुम्हाला माहित आहे का? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न देखील निर्माण झाले असतील आणि त्याचे उत्तर देखील शोधायचा प्रयत्न देखील केला असेल. पण त्याने त्यांचे समाधान झाले नसेल. तर आम्ही आज तुम्हाला या मागील सत्य सांगणार आहोत.

रुग्णालयातील डॉक्टर पांढऱ्या कोटचा वापर रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी करत असतात. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचे प्रतिक असल्यामुळे कायम सकारात्मक वातावरण रुग्णालयामध्ये असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येते. त्याप्रमाणेच पांढऱ्या रंगाचा उपयोग जंतूसंसर्ग होऊ नये यासाठीदेखील होतो. शरीराचे तापमान पांढऱ्या रंगामुळे स्थिर राहते. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचेदेखील प्रतिक आहे.

विशेष म्हणजे पांढऱ्या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील महत्वाचे असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक असलेल्या वस्तु सामान ठेवता यावे यासाठी हे खिसे मोठे ठेवण्यात येतात. दरम्यान, डॉक्टरांची सध्याच्या काळामध्ये ओळख पांढरा कोट म्हणूनच झाली आहे. पण हा पांढरा कोट नसून त्याला अॅप्रिन असे म्हटले जाते. गुडघ्यापर्यंत लांब हे अॅप्रिन असून तो सूती, लिनन किंवा सूती पॉलिएस्टर यांच्यापासून तयार केले जातो.

Leave a Comment