येथील जमिनीखाली अस्तित्वात आहे खरेखुरे पाताळ


आपण आजवर आजोबा किंवा आजीने सांगितलेल्या गोष्टीत पाताळ असते ऐकले असेल आणि लहानपणी त्याची केवळ कल्पना केली असेल. पण आता जर आम्ही तुम्हाला सांगितले की अशी एक जागा आहे जिथे जमिनीच्या खाली खरेखुरे पाताळ अस्तित्वात आहे तर यावर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही.

ऑस्ट्रेलियाच्या एडिलेट शहरापासून ८०० किमी दूर असलेल्या गावात आपण पाताळलोकचा अनुभव घेऊ शकता. हे ऐकून तुम्हाला विश्वास वाटणार नाही पण एका होलमध्ये कूबर पेडी नावाचे संपूर्ण गाव वसलेले आहे. जमिनीच्या आत वसलेले गाव फक्त एका होलमधून दिसते.

जमिनीच्या आत बनविण्यात आलेल्या अंडरग्राउंड घरांमध्ये येथील ६० टक्के लोक राहतात. वरतून मातीप्रमाणे दिसणाऱ्या या घरांची सजावट कोणा महलापेक्षा कमी नाही.

येथे ओपल स्टोनच्या शोधासाठी १९१५ साली मायनिंगचे काम सुरु केल्यामुळे येथे राहणाऱ्या अनेक लोकांना राहण्याच्या जागेचा प्रश्न उद्भवला. जेव्हा मायनिंगचे काम संपले तेव्हा लोकांनी इतरत्र कोठेही न जाता मायनिंग दरम्यान झालेल्या होलमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

ओपल स्टोन एक फारच महागडा दगड असून ज्वेलरी बनविण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. आपल्याला जगातील ९५ टक्के ओपल येथेच मिळतो.

Leave a Comment