गोगलगायीच्या नव्या प्रजातीला ग्रेटा थनबर्गने दिले हे नाव


बंदर सेरी बेगावन : गोगलगायीची एक नवी प्रजाती ब्रुनेईमधील शास्त्रज्ञांनी शोधली असून पर्यावरण एक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्ग यांच्या नावावर तापमानास संवेदनशील असलेल्या या प्रजातीचे नाव क्रास्पेडोट्रोपिस ग्रेटाथनबर्ग ठेवले गेले आहे. जगभरात हवामान बदलाविषयी जनजागृती करण्याचे कार्य ग्रेटा करीत आहेत. हेच प्रयत्न पाहता हा सन्मान दिला गेला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याचे ग्रेटा थनबर्गच्या नावाने नामकरण करण्यामागचा आमचा उद्देश्य हे सांगतो की, त्या समस्यांवर थनबर्गच्या पिढीला उपायही शोधावा लागेल, त्यांनी ज्या निर्माण केल्या नाहीत. ही गोगलगाय दोन मिमी लांब आणि एक मिमी रुंद आहे.

बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासामध्ये सांगितले गेले आहे की, कॅनोगॅस्ट्रोपॉड्स समुदायाशी संबंधित गोगलगायींची ही प्रजाती आहे. जमिनीवर राहणाऱ्या या प्रजातीवर दुष्काळ, तापमानात अत्यधिक चढ उत्तर आणि जंगलांची होणारी हानी यांचा परिणाम होतो. नेदरलँड्सच्या नॅच्युरल बायोडायव्हर्सिटी सेंटरचे मेनो शिल्थुईजेन यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी सांगितले की, ब्रूनेईच्या कुआला बेलालॉन्ग फील्ड स्टबडीज सेंटरच्या जवळ नव्या प्रजातीच्या गोगलगायी मिळाल्या. शास्त्रज्ञांनी संगितले की, नव्या प्रजातीच्या शोधासाठी सर्व काम अशा जागेवर केले गेले, जिथे केवळ प्राथमिक सुविधा होत्या. इंटरनेटदेखील उपलब्ध नव्हते. हा शोध 10 दिवस चालला.

Leave a Comment