माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी केला माझ्या वक्तव्याचा विपर्यास


मुंबई – काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे भाषणादरम्यान एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी चिखावणीखोर वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली. या संदर्भात आता वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून मी हिंदूविरोधी आणि देशविरोधी असल्याचे चित्र उभे केले. पण, कोणत्याही धर्माचा मी अनादर केला नाही, तसेच माझी व पक्षाची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. या वक्तव्याचा काही पत्रकार तसेच राजकीय नेत्यांनी विपर्यास केला. पण, कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर ते शब्द मागे घेतो, असे पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment