धक्कादायक! कोणीही जॉईन करु शकतो तुमचा व्हॉट्सअॅप ग्रुप…


जरी वारंवार व्हॉटसअॅपकडून सुरक्षिततेचा दावा केला जात असला तरी डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हॉटसअॅपचे ग्रुप चॅटिंग सध्या धोक्यात आहे. कारण गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्या व्हॉटसअॅप ग्रुपची लिंक सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे तुमचा प्रायव्हेट असलेला ग्रुप कोणीही जॉईन करू शकतो.

यासंदर्भात मदरबोर्डने दिलेल्या बातमीनुसार प्रायव्हेट व्हॉटसअॅप ग्रुपची इनव्हाइट लिंक गुगल सर्चमध्ये मिळत आहे. गुगलने या बातमीनंतर यावर कारवाई करत इनवाइट लिंकची माहिती दाखवणे बंद केले आहे. पण समोर आलेली त्रुटी खूप धक्कादायक होती.


कोणीही व्हॉटसअॅपच्या या त्रुटीचा फायदा उठवून तुमच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये अॅड होऊ शकले असते. मदरबोर्डच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, गुगलवर मिळणाऱ्या लिंकच्या मदतीने एक ग्रुप जॉइन केला आणि ग्रुपच्या सर्व मेंबरचा नंबर त्यांना घेता आले. मदरबोर्डने पुढे म्हटले की, तुमचा व्हॉटसअॅप ग्रुप सुरक्षित नाही. कोणीही गूगलवर सर्च करून तुमच्या ग्रुपमध्ये अॅड होऊ शकते. याबाबत माहिती देताना अॅप रिव्हर्स इंजिनिअर जेन वोंग यांनी म्हटले की, गुगलवर site: chat.whatsapp.com सर्च केल्यानंतर जवळपास 4,70,000 रिझल्ट मिळत होते.

ग्रुप इनव्हाइटच्या लिंकचा यामध्ये समावेश होता. यावर व्हॉटसअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, सोशल मिडीया साइट किंवा गुगलवर ज्या ग्रुपच्या इनव्हाइट लिंक शेअर केल्या आहेत त्यांच्याच ग्रुपच्या लिंक सर्च केल्यावर मिळत असल्यामुळे ग्रुप इनव्हाइट लिंक शेअर करताना युजर्सनी काळजी घ्यावी.

Leave a Comment