असे देखील असू शकते सार्वजनिक शौचालय


फोटोमध्ये दिसणारे हे वेव शेप स्ट्रक्चर तुम्हाला काय वाटत आहे ? काचेचे दरवाजे असलेले रस्त्याच्या कडेला बनलेले हे दुसरे तिसरे काहीही नसून सार्वजनिक शौचालय आहे. ही शानदार कॉटेज टाइप रूम शौचालय आहे. रस्त्यावरून येणारे-जाणारे याचा वापर करतात.

नॉर्वे येथील युरेडप्लासेन ठिकाणी रेस्टरूम बनवण्यात आली आहे. येथे बसून लोक समुद्र आणि डोंगरांच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेतात. पर्यटक या ठिकाणी आल्यावर या जागेचा नेहमीच वापर करतात.

या वॉशरूमच्या बाहेर मार्बलपासून बनवण्यात आलेले बेंच देखील आहेत. पर्यटक येथे बसून समुद्राचा आनंद घेतात.

View this post on Instagram

#ureddplassen #gildeskål #utedo

A post shared by Tommy Iversen (@tommiver) on

नॉर्वेची युरेडप्लासेन ही जागा एका मेमोरियल देखील आहे. द्वितीय विश्व युध्दा दरम्यान युरेड नावाची सबमरीन फुग्लोजॉर्डन येथे धडकली होती. यामध्ये 42 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सन्मानार्थ डोंगरांवर त्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत.

या सार्वजनिक रेस्ट रूमला ह्युजेन जॉहर आर्किटेक्टने बनवले आहे. या बाथरूमचे वैशिष्ट म्हणजे बाहेर जेवढा जास्त अंधार असेल, तेवढा जास्त आत प्रकाश असतो. या बाथरूमचा वापर व्हिलचेअरवर बसलेले लोक देखील करू शकतात.

Leave a Comment