आता मुलांच्या टीक-टॉकवर राहणार पालकांचे कंट्रोल


सध्याच्या तरुणाईमध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप टीक-टॉकची प्रचंड क्रेझ आहे. टीक-टॉकने फक्त तरुणाईलाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. टीक-टॉकची चांगलीच भूरळ सामान्यांसोबतच सेलिब्रेटींनाही पडली आहे. पण या अॅपचा लहान मुलांकडून वाढता वापर बघता त्यावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. टीक-टॉकने हीच बाब लक्षात घेत नवे सेफ्टी फिचर लॉन्च केले आहे. या फिचरचे नाव ‘फॅमिली सेफ्टी मोड’ (Family Safety Mode) असे असून यामुळे पालक मुलांच्या टीक-टॉक व्हिडिओवर लक्ष ठेवू शकतील. पालकांना या फिचरमुळे मुलांचे अकाऊंट आपल्या अकाऊंटसोबत लिंक करता येईल.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस टीक-टॉकची लोकप्रियता वाढत असल्याने युजर्संना अॅप सुरक्षित वाटावे यासाठी नवनवे फिचर्स सादर केले जात आहेत. पालकांना Family Safety Mode या नव्या फिचरमुळे आपल्या मुलाचे टीक-टॉक अकाऊंट कंट्रोल करता येईल आणि त्यावर लक्षही ठेवता येईल. त्याचबरोबर युजर्स टीक-टॉकवरुन ब्रेक घेण्यासाठी ते किती वेळ अॅपवर घालवतात याचीही माहिती त्यांना मिळावी यासाठी आम्ही screen time management सह सेफ्टी व्हिडिओजची मालिका काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. Family Safety Mode हे नवे फिचर सर्व प्रथम UK मध्ये लॉन्च करण्यात येईल. त्यानंतर इतर देशातील युजर्संना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Leave a Comment