या देशात भाडेतत्वावर मिळतो नवरदेव


हनोई: या जगाच्या नकाशावर एक असा देश आहे जिथे चक्क नवरा मुलगा भाडेतत्त्वावर दिला जातो. ऐकण्यास थोडे जड जाते आहे ना? पण हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला त्या देशाविषयी माहिती सांगणार आहोत.

तो देश आहे व्हिएतनाम. चक्क नवरदेव भाड्याने देऊन या देशातील काही कंपन्या प्रचंड पैसा कमावतात. या देशात अशा कंपन्यांचे जणू काही पेवच फुटले आहे. केवळ नवरदेवच नाही तर, त्याच्यासोबत वऱ्हाडीमंडळीही या कंपन्या भाड्याने देतात. कमीत कमी ४ लाख रूपये एका लग्नात नवरेदव आणि नातेवाईक भाड्याने (मामा, मामी, काका, काकी, आत्या, मावशी आदी.) देण्यासाठी शुल्क आकारले जाते. या कंपन्या ग्राहकाच्या मागणीनुसार २० ते ४०० पाहुण्यांची व्यवस्था करू शकतात.

व्हिएतनाममध्ये सध्या अशी समस्या निर्माण झाली आहे कि येथील अनेक मुली या कुमारी माता बनत आहेत. यात धक्कादायक असे की, एखादी बिना लग्नाची मुलगी जर गरोदर राहिली तर, तिला कलंक मानले जात असल्यामुळे या सामाजिक कलंकातून मुक्तता मिळविण्यासाठी येथे बनावट विवाह केले जातात. या कंपन्या अशा आडल्या-नडल्या कुटुंबियांना गाठून प्रचंड फायदा कमावतात. केवळ दिखावा म्हणून गर्भवती मुलींसोबत लग्न करण्यासाठी या कंपन्या भाडेतत्वावर नवरदेव पुरवतात. या कंपन्या त्यासाठी शुल्क म्हणून लाखो रुपये आकारतात. हे शुल्क नवरदेवांच्या आणि मुलीच्या प्रतवारीनुसार (आर्थिक) ठरते. सध्या तेथे भाडेतत्वावर नवरदेव म्हणून लग्नाच्या मंडपात उभा राहणे हा एक व्यवसायच बनला आहे. तेथे भाडेतत्वावर लग्नासाठी उभा राहिलेला नवरेदव हा पूर्वीपासूनच विवाहीत असतो.

Leave a Comment