गणेश नाईक समर्थक ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई – नवी मुंबई महापालिकेतील ४९ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या आमदार गणेश नाईकांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते गणशे नाईक यांना धक्के देण्यास सुरुवात झाली आहे. काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुरेश कुलकर्णी असल्याचे वृत्त समोर आले आहे. मातोश्रीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हे नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मुद्रीका गवळी, सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी यांच्यासह संगीता वास्के अशा एकूण चार नगरसेवकांचा समावेश असून हे चारही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीने नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकला असून महाविकास आघाडीने नवी मुंबईतील वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप नगरसेवकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Leave a Comment