पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहेत ‘फ्रेंड्स’


आजही तरुणाईमध्ये हॉलिवूडच्या ‘फ्रेंड्स’ या वेबसिरीजची क्रेझ पाहिली जाते. यातील कलाकारांची तुफान लोकप्रियता ही मालिका संपल्यानंतरही कायम आहे. या मालिकेतील कलाकारांनी पुन्हा एकत्र यावे, अशी चाहत्यांची इच्छा होती. फ्रेंड्सचे कलाकार जेनिफर एनिस्टन, कॉर्टनी कॉक्स, लीजा कुडरो, मैट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्वीमर हे त्यांची हीच इच्छा पूर्ण करत पुन्हा एका कार्यक्रमाच्या भागात एकत्र येणार आहेत.


या मालिकेचा अखेरचा भाग २००४ साली प्रसारित झाला होता. त्यानंतरही सोशल मीडियावर या कलाकारांची क्रेझ आहे. या मालिकेने नेटफ्लिक्सवर सर्वाधिक वेळा पाहिला जाणाऱ्या कार्यक्रमांमध्येही स्थान मिळवले आहे. याबाबत माहिती देताना होम एंटरटेनमेंटचे मालक वॉर्नर ब्रोस यांनी सांगितले आहे, की नेटफ्लिक्सवर जेव्हा ‘फ्रेंड्स’ ही मालिका प्रदर्शित केली जाणार होती, तेव्हा या मालिकेची डिजीटल व्यासपीठांवर तीनपट जास्त कमाई झाली.

आता एचबीओ मॅक्स या वाहिनीवरील एका कार्यक्रमाच्या भागात डेविड, जेनिफर, कटेर्नी, मैट, लिसा आणि मॅथ्यू पुन्हा एकत्र येणार आहेत. या सर्व कलाकारांनी फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. ‘फ्रेंड्स’च्या रियुनियनसाठी चाहते उत्सुक असल्याचे ट्विटरवरही पाहायला मिळत आहेत. या विशेष कार्यक्रमाचे दिग्दर्शन या मालिकेचे कार्यकारी निर्माता केविन ब्राईट, मार्ता कॉफमॅन आणि डेव्हिड यांच्यासोबत केले जाणार आहे.

Leave a Comment