‘हाथी मेरे साथी’मध्ये राणा दग्गुबत्तीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता


लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाद्वारे ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’मध्ये ‘भल्लालदेव’ची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणाने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. राणाची मुख्य भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राणासोबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. नुकताच त्याचाही फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


या चित्रपटात राणासोबत अभिनेता पुलकित सम्राट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. काझिरंगा राष्ट्रीय उद्यानमधील हत्तींवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा जंगली प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटात राणा आणि पुलकित व्यतिरिक्त श्रीया पिळगावंकरचीही भूमिका आहे. केरळ, महाबळेश्वर आणि मुंबई यांसारख्या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. तसेच काही भाग हा थायलंड येथेही चित्रीत करण्यात आला आहे.

हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन करत आहेत. तर, ईरॉस इंटरनॅशनल अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट २ एप्रिल २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment