या तारखेला लाँच होणार वोल्सवॅगनची बहुप्रतिक्षित एसयूव्ही ‘T-Roc’

वोल्सवॅगनची बहुप्रतिक्षित एसयूव्ही टी-रॉक (T-Roc) 18 मार्चला भारतात लाँच होणारा आहे. काही दिवसांपुर्वीच ऑटो एक्स्पोमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला सादर करण्यात आले होते. ही एसयूव्ही सध्या केवळ पेट्रोल इंजिनमध्ये येणार आहे. वोल्सवॅगनच्या टी-रॉक एसयूव्हीची टक्कर जीप कंपस आणि ह्युंडाई टूसॉन सारख्या एसयूव्हीशी होईल.

कंपनीने सांगितले की, ही एसयूव्ही पेट्रोल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत येईल. यामध्ये 1.5 लीटर टीएसआय इंजिन मिळेल. जे 148 बीएचपी पॉवर आणि 240 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यासोबत 7 स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रांसमिशन स्टँडर्ड देखील मिळेल.

Image Credited – NDTV

लूकबद्दल सांगायचे तर वोल्सवॅगन टी-रॉक खूपच बोल्ड आणि स्टाईलिश आहे. या एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, ड्यूअल-टोन एलॉय व्हिल्ज, एलईडी टेललॅम्प आणि रूफ रेल्स मिळेल.

Image Credited – NDTV

या एसयूव्हीचे कॅबिन खूपच प्रिमियम आहे. यात फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हिल, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसोबत मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, फूल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 2-झोन क्लायमेंट कंट्रोल, लेदर सीट्स आणि पॅनोरमिक सनरूफसारखे फीचर्स मिळतील.

सेफ्टीसाठी यात 6-एअरबॅग्स, ईबीडीसोबत ईबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पार्क डिसेंट कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखे फीचर्स मिळतील.

Leave a Comment