शीख समुदायासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने बदलला गणवेश

अमेरिकेच्या हवाई दलाने शीखांसह विविध समुदायातील लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन आपल्या गणवेशात (ड्रेस कोड) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून, या समुदातील लोकांना हवाई दलात सहभाही होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये.

हवाई दलाने या नवीन नीतिला 7 फेब्रुवारीला अंतिम मंजूरी दिली. नागरिक अधिकारांसाठी काम करणारी संस्था शीख कोअलिशनने याबाबत म्हटले की, शीख-अमेरिकनन आपल्या धार्मिक मान्यता आणि करिअरच्या महत्त्वकांक्षेमध्ये एकाची निवड करू नये. हवाई दलाने केलेले बदल त्यांनी 2009 मध्ये सुरू केलेल्या अभियानाचाच परिणाम आहे.

शीख कोअलिशनचे वकील गिजॅले क्लॅपर म्हणाले की, शीखांनी अमेरिकन सुरक्षा दल आणि जगभरातील लष्कराचत सन्मानपुर्वकरित्या आपल्या क्षमतेनुसार सेवा दिली आहे. शीख अमेरिकन नागरिकांनी लष्कराच्या सर्व शाखांमध्ये सेवा द्याव्यात असे आम्हाला वाटते. ही नवीन नीति एअर फोर्समध्ये समान संधी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले एक चांगले पाऊल आहे.

Leave a Comment