स्वीडनमध्ये सुरू झाले हे अफलातून बर्फाचे हॉटेल

स्वीडनचे जगप्रसिद्ध आईस हॉटेल पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सुरू झाले आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हे हॉटेल बनवले जाते व हिवाळ्यानंतर 5 महिन्यात हे हॉटेल विरघळते. 1989 पासून हे हॉटेल बनविण्यात येत आहे. यंदाचे हॉटेलचे 31वे वर्ष आहे.

हे हॉटेल आर्कटिक सर्कलपासून जवळ 200 किमी अंतरावरील टॉर्न नदीच्या किनाऱ्यावर आहे. याला बनविण्यासाठी टॉर्न नदीतून 2500 टन बर्फ जमा केला जातो.ऑक्टोंबर पासून याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. हे हॉटेल बनविण्यासाठी जगभरातून लोक येतात.

Image Credited – Bhaskar

यावेळी येथे 35 बेडरूम तयार करण्यात आलेले आहेत. यांना बर्फाचे नक्षीदार पडदे आणि हरणाच्या प्रतिकृतींनी सजविण्यात आलेले आहे. येथे एक सभागृह देखील तयार करण्यात आले असून, येथे बसण्यास 6 बेंच ठेवण्यात आलेल्या आहेत.

खोलीत तापमान मायन्स 5 डिग्री एवढे असते. दरवर्षी 50 हजार पर्यटक येथे राहण्यासाठी येतात. मे महिन्यानंतर बर्फ विरघळण्यास सुरुवात होती व हॉटेल बंद होते.

Image Credited – Bhaskar

हे हॉटेल पर्यावरण पुरक असून, येथील सर्व उपकरणे सौर उर्जेच्या माध्यमातून चालतात. येते एक आईस बार देखील आहे. येथील ग्लास देखील बर्फापासून बनविण्यात आलेले आहेत. यात फीचर लाईटिंगची देखील व्यवस्था आहे. हॉटेलच्या आत आईस सेरेमनी हॉल आणि लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह झोन देखील आहे.

Leave a Comment