आता महिलांसाठी पण आला फिमेल व्हायग्रा

सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एल मॅकफर्सनने एक खास पाउडर लाँच केली आहे. या पाउडरचा उपयोग महिला व्हायाग्रासारखा करू शकतात, असा दावा मॅकफर्सनने केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या मॅकफर्सनने या पाउडरची विक्री देखील सुरू केली असून, 14 दिवसांच्या कोर्ससाठी 7,900 रुपये किंमत ठेवली आहे.

एले या नवीन पाउडरचे नाव ‘द सुपर बूस्टर वूमन लिबिडो अँड हार्मोन सपोर्ट’ असे ठेवले आहे. एले लाइस्टाइल ब्रँड वेल्लेको (welleco)  चालवते. हा ब्रँड जगभरात लोकप्रिय आहे.

55 वर्षीय एलेचे म्हणणे आहे की, या पाउडरमुळे तिची सेक्स लाईफ अधिक चांगली झाली आहे. तिला तणाव जाणवत असताना, तेव्ही ही पाउडर तिची मदत करते.

एलेने सांगितले की, ही पाउडर पुर्णपणे हर्बल असून, नैसर्गिकरित्या महिलांचे हार्मोन आणि एनर्जीचा समतोल साधण्याचे काम करते. केले आणि एडम नावाच्या जोप्याने या पाउडरचा वापर केल्यानंतर अनुभव खूपच चांगला असल्याचे देखील सांगितले.

Leave a Comment