भारतीय विमानाला परवानगी देण्यास चीनकडून जाणीवपुर्वक उशीर

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. भारताने वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाचे विमान पाठवले आहे. मात्र चीनी अधिकाऱ्यांकडून विमानाला क्लियरेंस (परवानगी) दिलेला नाही.

यावर भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जगातील अनेक देश चीनला मदत आणि आपल्या नागरिकांना आणण्यासाठी विमाने पाठवत आहेत. सर्वांना चीनकडून परवानगी मिळत आहे. मात्र भारतीय रिलिफ फ्लाइट्सला परवानगी दिलेली नाही. त्यांना भारताकडून मदत नको आहे का ?

भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांना पत्र लिहून चीनी सरकारला जमेल तेवढी मदत करणार असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 2,345 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची 12 जणांची टीम देखील चीनमध्ये पोहचली असून, ही टीम कोरोना व्हायरस संबंधित प्रकरणांचा तपास करेल.

Leave a Comment