निवृत्तीच्याच दिवशी पीएफ रक्कम मिळवण्यासाठी करा हे काम

कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रोव्हिडेंट फंड (पीएफ) सर्वात महत्त्वाचा असतो. हा फंड सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असतो. याच कारणामुळे अनेकजण निवृत्तीच्या दिवशीच पीएफ खात्यातून पैसे काढू इच्छितात.

जर तुम्ही देखील असा विचार करत असाल, तर सर्वात प्रथम युनिव्हर्सल खाते नंबर (यूएएन) आधारकार्डशी लिंक करा. जर तुम्ही यूएएन नंबर आधारकार्डशी लिंक केले नसेल तर तुम्ही पीएफ संबंधीत महत्त्वाच्या सुविधा मिळणार नाहीत. पीएफ खात्याची सर्व सुविधा मिळवण्यासाठी यूएएन नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

केंद्रीय भविष्य निधी आयुक्त सुनील बर्थवाल यांच्यानुसार, कर्मचारी भविष्य निधी संघटन अशा प्रणालीवर काम करत आहे, ज्याद्वारे व्यक्तीला निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निधी मिळेल व वेळेवर पेंशन देखील सुरू होईल.

2017 मध्ये तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी देखील या सुविधेबाबत माहिती दिली होती. या व्यतिरिक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) पीएफ खात्यातील योगदानाबाबत लक्ष ठेवण्यासाठी लवकरच ई-प्रणालीची सुरुवात केली जाणार आहे.

ईपीएफओच्या या निर्णयामुळे देशातील जवळपास 8 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे.

Leave a Comment