आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे तयार करण्यात आले अँटीबायोटिक

अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआयटी) वैज्ञानिकानी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने पहिल्यांदा नवीन अँटीबायोटिक तयार केले आहे. याद्वारे धोकादायक बॅक्टेरियांना नष्ट करता येईल.

जर्नल सेलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, वैज्ञानिकांनी या नवीन अँटीबायोटिकला हेलिसन नाव दिले आहे. हे अँटीबायोटिक खूपच शक्तीशाली असून, ई-कोली सारख्या बॅक्टेरियाला देखील हे सहज नष्ट करू शकते.

बायोइंजिनिअर आणि एमआयटी रिसर्च टीमचे जेम्स कॉलिन म्हणाले की, हेलिसिनचा प्रयोग सध्या उंदरांवर करण्यात आलेला आहे. लवकर मनुष्यांवर देखील याची चाचणी केली जाईल. बॅक्टेरियावर अँटीबायोटिकचे परिणाम कमी होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आम्ही एआयच्या मदतीने असा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत, ज्याद्वारे नवीन प्रकारच्या औषधांचा शोध लावता येईल.

संशोधकांनुसार, मनुष्याद्वारे केल्या जाणाऱ्या कामाच्या तुलनेत एआयच्या मदतीने काम कमी वेळेत अधिक चांगले होते. याद्वारे काही दिवसातच 10 कोटींपेक्षा अधिक रसायनांची तपासणी करता येईल, ज्याद्वारे बॅक्टेरिया नष्ट करत येतील.

संशोधक जोनाथन स्टॉक्स म्हणाले की, आम्ही एआयचा वापर करून औषधांच्या किंमती कमी करण्यासोबतच, असे मार्केट तयार करत आहोत जेथे जटिल आजारांवरील उपचार देखील शक्य आहे.

Leave a Comment