आता 5 रुपयांमध्ये बघा नेटफ्लिक्स

मागील काही महिन्यांत ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आपला बाजार भारतात वाढवण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. मागील वर्षी कंपनीने 199 रुपयांचा मोबाईल प्लॅन लाँच केला होता. आता कंपनीने आणखी एक खास ऑफर आणली आहे. नवीन युजर्सला आता नेटफ्लिक्सच्या एका महिन्याचे सबस्क्रिप्शन अवघ्या 5 रुपयांमध्ये मिळणार आहे.

रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स भारतात नवीन मेंबर्ससाठी एक नवीन इंट्रोडक्टरी ऑफरची टेस्टिंग करत आहे. या ऑफर अंतर्गत नेटफ्लिक्स मेंबरशिपसाठी साइन अप करणाऱ्या नवीन युजर्सला पहिल्या महिन्याचे सबस्क्रिप्शन 5 रुपयांमध्ये मिळेल. मात्र एका महिन्यानंतर युजर्सला निवडलेल्या प्लॅनसाठी निश्चित केलेले चार्जेस द्यावे लागतील.

ही ऑफर 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. सर्व मेंबर्स या प्रमोशनल ऑफर्सचा लाभ घेऊ शकणार नाहीत. मात्र ही ऑफर नेटफ्लिक्सच्या सर्व प्लॅन्ससाठी आहे. म्हणजेच तुम्ही 199 रुपये अथवा 799 रुपयांच्या सर्वात महागड्या प्लॅनसाठी पहिल्या महिन्याला 5 रुपयांमध्ये सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ही ऑफर नवीन मेंबर्सला दिसणे गरजेचे आहे व हे कंपनीवर निर्भर आहे.

सध्या ऑनलाईन स्ट्रिमिंग सेवामध्ये नेटफ्लिक्सचे प्लॅन सर्वात महागडे असून, प्रतिस्पर्धी कंपनी अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5 यांचे प्लॅन्स स्वस्त आहेत.

Leave a Comment