ही आहे जगातील पहिली 3डी प्रिंटेड हायब्रिड हायपर’कार’

जगातील पहिल्या 3डी प्रिंटेड हायब्रिड हायपरकार संबंधीत माहिती समोर आली असून, या कारला Czinger या कंपनीने बनवले आहे. या 3डी प्रिंटेड कारला Czinger सी21 असे नाव देण्यात आलेले आहे. ही कार पुढील महिन्यात जिनिव्हा मोटर शोमध्ये देखील सादर केली जाणार आहे.

या कारचे संपुर्ण डिझाईन, निर्मिती आणि मॅनिफॅक्चरिंग अशी सर्व कामे लॉस एंजिलेसमध्ये कंपनीच्याच कर्मचाऱ्यांद्वारेच करण्यात आलेली आहेत.

Image Credited – Motor Authority

या कारचे चेसिस खूपच हलके आहे व याला हाय परफॉर्मेंस एलॉय आणि कार्बन फायबर मल्टी स्ट्रक्चरपासून बनविण्यात आलेले आहे. मात्र या हायब्रिड हायपरकारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे हायब्रिड पॉवरट्रेन आहे. हे 4 व्हिल ड्राईव्हस आहे. या कारचे पॉवरट्रेन 1233 बीएचपी पॉवर देते. यात हायड्रॉलिक मल्टी प्लेट क्लचसोबत 7 स्पीड सिक्वेनशल ट्रांस्केल गिअरबॉक्स  मिळेल.

Image Credited – NDTV

यात 2.88 लीटर, फ्लॅट क्रँक व्ही8 ट्विन टर्बोझ इंजिन मिळेल व पुढील व्हिलसाठी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली आहे. ही कार अवघ्या 1.9 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

Image Credited – NDTV

अशा केवळ 80 हायब्रिड हायपरकारचीच निर्मिती केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आली आहे. या कारची किंमत तब्बल 1.7 मिलियन (जवळपास 12.22 कोटी रुपये) आहे.

Leave a Comment