आयुष्मानच्या चित्रपटावर ट्रम्प यांनी दिली ही प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या निमित्ताने ते भारतासंबंधी अनेक ट्विट करत आहे. त्यांनी अभिनेता आयुष्मान खुरानाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चे देखील कौतूक करणारे ट्विट केले.

ट्रम्प यांनी ब्रिटिश कार्यकर्ते पीटर टॅचेल यांनी केलेल्या चित्रपटाच्या ट्विटला रिट्विट करत ‘ग्रेट’ अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.

यानंतर पीटर यांनी ट्विट केले की, मला आशा आहे की राष्ट्रपती यांचे हे ट्विट पीआर स्टंट नसावा व त्यांची एलजीबीटी समुदायाला गंभीरतेने घेण्याची सुरुवात असावी.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे त्यांचे स्वागत करतील. दोन्ही नेते रोड शो देखील करणार आहेत. यावेळी ट्रम्प यांची पत्नी, मुलगी इवांका आणि जावई देखील असणार आहेत.

Leave a Comment