येथे सापडले हिमयुगातील हजारो वर्ष जुन्या पक्षाचे अवशेष

स्वीडिश म्यूझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीच्या विशेषज्ञांना सायबेरियामध्ये 46 हजार वर्ष जुन्या पक्षाचे अवशेष सापडले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, हा पक्ष्याचे अवशेष आजही संरक्षित आहेत. हा पक्षी हॉर्न्ड लार्क आहे, जो पुर्व रशिया आणि मंगोलिया या भागात आजही आढळतो.

या पक्ष्याला सायबेरियाच्या बेलाया गोरा गावातील स्थानिक शिकाऱ्यांनी  शोधले होते. त्यानंतर त्यांनी या पक्ष्याला तज्ञ निकालाज डुसेक्स आणि लव्ह डेलेन यांच्याकडे अधिक माहितीसाठी सोपवले होते.

रेडियोकार्बन तंत्रज्ञानाच्या मदतीने हा पक्षी 46 हजार वर्ष जुना असल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षानंतर देखील हा पक्षी अजिबात खराब झालेले नाही. याबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की, सायबेरिया हा एक थंड प्रदेश आहे. येथील वर्षातील अधिकतर दिवस तापमान मायन्समध्ये असते. याच कारणामुळे एवढ्या वर्षानंतर देखील पक्ष्याच्या शरीराला काहीही नुकसान झालेले नाही. या संबंधीत संशोधन रिसर्च जनरल कम्युनिकेशन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे.

तज्ञ डेलेन यांनी सांगितले की, हा पक्षी सध्या आढळणाऱ्या लार्क पक्ष्याचा पुर्वज आहे. याची एक प्रजाती रशिया आणि मंगोलियामध्ये आढळते. या शोधाचा निष्कर्ष हा निघाला की, हिमयुगाच्या अखेर हवामान बदलामुळे अनेक पक्ष्यांच्या नवीन उपप्रजाती निर्माण झाली. याद्वारे आजच्या लार्क पक्ष्यांबद्दल नवीन माहिती मिळू शकते.

Leave a Comment