आता सोनभद्रमध्ये ‘यूरेनियम’चा साठा ?

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या डोंगरात 3 हजार टन सोन्याचा भांडार असल्याची पुष्टी झाली आहे. आता यासाठी लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. यासोबतच सोनभद्रमध्ये यूरेनियम देखील मिळण्याची शक्यता आहे.

सोनभद्रचे खनिज अधिकारी के के राय यांनी सांगितले की, जिल्ह्यात यूरेनियमचे देखील भांडार असण्याची शक्यता आहे. ज्याचा शोध केंद्रीय व अन्य टीम घेत आहे. भूविज्ञान आणि खाणकाम विभाग आणि जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या टीम कार्य करत आहेत.

Image Credited – Aajtak

जिल्ह्यातील लोक देखील यामुळे खूश आहेत. येथील दोन डोंगरांमध्ये सोन, यूरेनियमसह अनेक धातू व धातूंच्या दगडांचा भांडार आहे. जिल्ह्यातील सोन डोंगरावरी सोन्याच्या भांडारासोबतच खाली यूरेनियमचा साठा सापडण्याची शक्यता आहे. वर्ष 2012 पासून यावर काम सुरू होते.

आतापर्यंत सांगण्यात येत आहे की, भारताकडे सोन्याचा साठा हा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र सोनभद्रमध्ये सापडलेल्या या साठ्यामुळे भारत सोने उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर येईल.

Image Credited – Aajtak

हा साठा सापडल्याने गावातील लोकांना देखील रोजगार मिळण्याची व विकासाची आशा आहे. सांगण्यात येते की इंग्रजांच्या काळात देखील या भांडाराबाबत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र यात यश आले नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, इंग्रजांच्या काळात सोन्याच्या शोधामुळेच याला सोन पहाडी असे नाव पडले आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासींचे देखील म्हणणे आहे की, ते सुरूवातीपासूनच याला सोन पहाडी या नावाने ओळखतात.

Image Credited – Aajtak

2005 मध्ये सर्वात प्रथम याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सोने असल्याची पुष्टी झाल्यानंतर सरकारने आता ई-टेंडरिंगद्वारे ब्लॉकच्या लिलावासाठी 7 सदस्यांची निवड केली आहे.

Image Credited – Aajtak

रिपोर्टनुसार, हरदी भागात 646.15 किलोग्रॅम आणि सोन पहाडी भागात 2943.25 टन सोन्याचा साठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत यूरेनियम आणि इतर धातूंच्या दगडांचा देखील साठा सापडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment