कूक यांच्या घरात घुसणाऱ्या भारतीयाच्या विरोधात खटला दाखल

टेक कंपनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांचा पाठलाग करणे व धमकी देण्याचा आरोप एका अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीवर करण्यात आला आहे. अ‍ॅपलनुसार, सॅन फ्रॅन्सिस्को येथील राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीने मागील दोन महिन्यात दोन वेळा कूक यांच्या पालो ऑल्टो प्रॉपर्टीमध्ये जबरदस्ती घुसून त्यांना फूल आणि शँपेन देण्याचा प्रयत्न केला. राकेश डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कूक यांच्या घरी विना परवानगी घुसला होता.

यावर राकेशने देखील अ‍ॅपलवर आरोप केले आहेत. राकेशने म्हटले आहे की, अ‍ॅपलने त्याची खिल्ली उडवली व तो हॉस्पिटलमध्ये भरती असताना त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. अ‍ॅपलच्या तक्रारीनंतर स्थानिक न्यायालयाने राकेशला कूक यांच्यापासून लांब राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 2 मार्चला होईल.

https://twitter.com/davegershgorn/status/1230607184263884800

याबाबतची माहिती वनझिरोचे लेखक डेव्ह गेर्शगोर्न यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याबाबतची कागदपत्रे त्यांनी शेअर केली असून, यामध्ये अ‍ॅपलचे एग्झिक्यूटिव्ह प्रोटेक्शनचे ग्लोबल सिक्युरिटी स्पेशलिस्ट विलियम बुर्न्स यांची न्यायालयात दिलेली ग्वाही देखील आहे.

कागदपत्रांपासून, टिम यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव राकेश शर्मा असून, त्याने 25 डिसेंबर आणि 2 ऑक्टोंबरला कूक यांना फोन केले व वॉइस मेल सोडला. त्यानंतर त्याने कूक यांचा पाठलाग देखील केला. त्याने कूक यांच्या खाजगी संपत्ती घुसण्याचा आणि त्यांना फूल व शँपेन देण्याचा देखील प्रयत्न केला. कागदपत्रांनुसार, आरोपी ट्विटरवर देखील कूक यांना फॉलो करतो व अश्लील फोटो पोस्ट करतो.

राकेश 15 जानेवारीला कूक यांच्या घरी जबरदस्ती घुसला. मात्र तेथून बाहेर पडण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.

 

Leave a Comment