भारताला हव्या असलेल्या एमएच ६० रोमिओ हेलीकॉप्टरची खासियत


अमेरीकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारतात येण्याअगोदरच भारताने एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर खरेदीचा सौदा केला आहे. अमेरिकन कंपनी लॉकहिड मार्टीन ही हेलीकॉप्टर बनविते आणि भारताला नौदलासाठी अशी २४ हेलिकॉप्टर्स हवी आहेत. या प्रकारची हेलीकॉप्टर्स फ्रांस आणि रशिया येथील कंपन्याही बनवितात पण भारताने या खरेदीत अमेरिकन कंपनीला प्राधान्य देण्यामागे काही कारणे आहेत. रोमिओच्या खासियती येथे जाणून घेणे त्यासाठी आवश्यक आहे.

जगभरातील नौसेनेसाठी आवश्यक असलेल्या अत्यावश्यक हेलीकॉप्टरमधील ही सर्वात अॅडव्हान्स्ड फोर्थ जनरेशनची हेलीकॉप्टर आहेत. बीबीसी रिपोर्ट नुसार यामुळे नौसेनाला अधिक बळकटी येणार आहे. ही मल्टीरोल हेलीकॉप्टर्स कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळी हमला करण्यास सक्षम आहेत. समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांचा ती अचूक वेध घेऊ शकतात. त्यासाठी मार्क ५४ टोरपेडो वापरला जातो.

ही हेलिकॉप्टर हवेतून जमिनीवर हेलफायर मिसाईल डागू शकतात त्यामुळे शत्रू जमिनीवर अथवा पाण्यात कुठेही असला तरी ती उपयुक्त आहेत. ही हेलिकॉप्टर सामान वाहून नेऊ शकतात. ती कॉम्पॅक्ट असल्याने कमी जागेत मावतात. त्याचे कॉकपिट अतिशय आटोपशीर आणि अॅडव्हान्स्ड आहे. त्याच्या इंधनटाकीपासून ते सॅटेलाईटवरून मिळणारी माहिती सर्व इंटरकनेक्टेड आहेत. भारताला या प्रकारच्या २४ हेलीकॉप्टरसाठी १.८६ अब्ज मोजावे लागणार आहेत. सध्या भारतीय नौसेनेकडे ब्रिटनची सीकिंग एमके ४२ बी हेलीकॉप्टर आहेत मात्र ती जुनी झाल्याने निवृत्त केली जाणार आहेत.

या हेलिकॉप्टर खरेदीमागे एक राजकीय डाव असल्याचेही सांगितले जात आहे. आपला शेजारी चीन समुद्री हद्दीत अतिक्रमण करण्याचा सतत प्रयत्न करतो आहे. अमेरिका आणि चीन यांचेही संबंध सध्या ताणलेले आहेत. अश्यावेळी भारत अमेरिका खरेदी सौदा भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment