वेस्टइंडीजच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानी नागरिकत्वासाठी अर्ज


फोटो सौजन्य कॅच न्यूज
वेस्ट इंडीजचा माजी कप्तान डेरेक सॅमी याने पाकिस्तानचे नागरीकत्व मिळावे म्हणून अर्ज केला असून त्यावर अनेकानी आश्चर्य व्यक्त केले आहे. डेरेकने २०१४ ते १८ या काळात दोन वेळा वेस्टइंडीजला आयसीसी टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.

डेरेकने पाक नागरिकत्वासाठी अश्या वेळी अर्ज केला आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानची परत एन्ट्री व्हावी यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे अनेक क्रिकेटपटू सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान मध्ये खेळण्यास नकार देत आहेत. डेरेकने मात्र पेशावर झालीला पीएसएल खिताब जिंकून दिला आहे. गुरुवारी पीएसएलचा पाचवा सिझन सुरु झाला असून प्रथमच ही स्पर्धा पाकिस्तान मध्ये होत आहे.

या स्पर्धेतील पेशावर झाली संघाचा मालक जावेद आफ्रिदी म्हणाला, डेरेकला आम्हीच पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारावे असे आवाहन केले होते ते त्याने मान्य केले. त्याचा नागरिकत्वाचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठविला गेला आहे. पीएसएलसाठी पाकिस्तानात येणारा तो पहिला खेळाडू आहे.

Leave a Comment