मोटेराचे उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते नाही- जीसीएचा खुलासा


फोटो सौजन्य क्रिकेट ट्रॅॅकर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम केला जात असला आणि नवीन स्टेडियम मधला हा पहिलाच कार्यक्रम असला तरी या स्टेडियमचे उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार नसून हा उद्घाटन सोहळा नंतर साजरा केला जाणार असल्याचा खुलासा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाथवानी यांनी केला आहे.


पत्रकारांशी बोलताना नाथवानी म्हणाले, नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम डोनल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी होत आहे. दोन आठवड्यापूर्वी ट्रम्प भारत भेटीवर येणार हे नक्की झाले तेव्हा त्याच्या स्वागताचा कार्यक्रम या स्टेडियम मध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी काही ठिकाणी स्टेडियमचे उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र ही माहिती चुकीची असून स्टेडियमचे उद्घाटन नंतर केले जाणार आहे.

जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार प्रेक्षकांची आहे. या स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे ठेवले जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment