पळपुट्या निरव मोदीच्या घोस्टचा ऑनलाईन लिलाव


फोटो सौजन्य बिझिनेस टुडे
देशातील बँकांना गंडा घालून परदेशी पलायन केलेला हिरे व्यापारी निरव मोदी याच्या जप्त केलेल्या आर्ट कलेक्शनचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय अंमलबजावणी संचालनालयाने घेतला असून हा लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्च रोजी होणार आहे. यात निरव मोदीच्या सुमारे ११२ वस्तूंचा समावेश असून मुख्य आकर्षण आहे ७५ ते ९० लाख रुपये किमतीची रोल्स रॉयस घोस्ट ही कार.

अन्य वस्तुमध्ये नामवंत कलाकारांच्या कलाकृती, महागडी घड्याळे, महागड्या हँडबॅग्ज, कार्स यांचा समावेश आहे. २० व्या शतकातील महत्वपूर्ण भारतीय कलाकारांच्या कलाकृतीत अमृता शेरगिल यांच्या १२ ते १८ कोटी रुपये किमतीच्या बॉईज विथ लेमन या कलाकृतीचा तसेच एमएफ हुसेन यांच्या महाभारत या कलाकृतीचा समावेश आहे. हुसेन यांच्या चित्राची किंमत १२ ते १८ कोटी मध्ये आहे. अमृता शेरगिल यांची कलाकृती प्रथमच लिलावात दिसणार आहे. सॅफ्रॉनआर्ट डॉट कॉमवर हा लिलाव होणार आहे.

Leave a Comment