या आहेत जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी

उत्तर प्रदेशमधील जनपद सोनभद्रच्या सोन टेकडीवर, 2943.25 टन आणि हरदी भागात 646.15 किलो सोन्याचा साठा (Gold Mine) सापडला असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. जगात अशा अनेक सोन्याच्या खाणी आहेत, जेथून हजारो टन सोने काढले जाते. या खाणींविषयी जाणून घेऊया.

Image Credited – bnamericas

जगातील 5 सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी पाचव्या क्रमांकावर चिली येथील खाण आहे. चिली येथील नॉर्ट एबेरेटो खाणी जवळपास 2.32 कोटी औंस सोने आहे. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम सोने.

Image Credited – mygoldguide

या यादीत चौथ्या क्रमांकावर पापुआ न्यू गिनीची लिहिर गोल्ड खाण आहे. येथे 2.40 कोटी औंस सोने आहे.

Image Credited – mygoldguide

रशियाच्या सर्बिया येथील ओलंपियाड ही खाण जगातील तिसरी सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. येथे 3.20 कोटी औंस सोने आहे.

Image Credited – mygoldguide

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्रासबर्ग ही सोन्याची खाण असून, ही खाण इंडोनेशियामध्ये आहे. येथे 2.60 कोटी औंस सोने आहे.

Image Credited – mining-technology

जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. साउथ डीप गोल्ड खाणीत अंदाजे 3.28 कोटी औंस सोने असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment