भारतीय सैन्याला मिळणार नवीन मुख्यालय, जाणून घ्या वैशिष्ट्य

दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन लष्कर भवनाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्त भूमिपूजन पार पडले. 7.5 लाख वर्गमीटरमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन लष्कर मुख्यालयाला तयार होण्यासाठी 5 वर्ष लागतील. नवीन लष्कर मुख्यालयात ऑफिस कॉम्पलॅक्ससोबतच पार्किंसाठी देखील विशेष सोय करण्यात येणार आहे.

नवीन मुख्यालयात 6 हजारांपेक्षा अधिक कार्यालये असतील. येथे सैन्यासोबतच नागरिकांसाठी देखील कार्यालय असेल.

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे भवन जवळपास 7.5 लाख स्केअर मीटर क्षेत्रात उभारले जाईल. यात ऑफिस कॉम्पलॅक्स आणि पार्किंगसाठी सुविधा असेल. या भवनात एकूण 6014 कार्यालये असतील. ज्यातील 1,684 कार्यालय लष्कर अधिकारी आणि नागरिकांसाठी असतील व इतर कार्यालय इतर सब स्टाफ असतील.

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे कमीत कमी 2 लाख तासांचे कुशल आणि अकुशल कामाचे निर्माण होईल. सोबतच युवकांसाठी नोकऱ्या देखील निर्माण होतील. हे भवन पुढील 5 वर्षात तयार होण्याचा प्रस्ताव आहे.

Leave a Comment