हे काम केल्यास मोफत मिळणार रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट

फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी एका हटके कल्पना लढवण्यात आली आहे. या अंतर्गत लोकांना मशीनसोर व्यायाम करावा लागेल, ज्याद्वारे त्यांना मोफत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

कसे मिळेल तिकीट ?

मशीन समोर पायाचे दोन निशाण आहेत. त्यावर उभे राहून उठाबशा काढाव्या लागतील. तुम्हाला 180 सेंकदामध्ये 30 उठाबशा काढाव्या लागतील. प्रत्येक उठाबशासाठी समोरील मशीनव पॉइंट दिसेल. जर तुम्ही निश्चित वेळेत 30 पॉइंट मिळवले तर तुम्हाला 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळेल.

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या आरोग्यासाठी विविध स्टेशनवर ‘हेल्थ एटीएम कियोस्क’ लावत आहे. यात प्रवाशी अगदी कमी पैशात आपल्या आरोग्यासंबंधी तपासणी करू शकतात. या तपासणीचा रिपोर्ट देखील त्वरित मिळेल. रेल्वे स्टेशनवर प्रवासी केवळ 50 रुपयांमध्ये फिटनेस संबंधित 16 प्रकारच्या तपासण्या करू शकता.

Leave a Comment