कलाकाराने चक्क पेन्सिलच्या टोकावर साकारले शिवलिंग

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने ओडिसाचे प्रसिद्ध मिनिएचर आर्टिस्ट एल ईश्वर राव यांनी पेन्सिलच्या टोकावर शिवलिंग साकारले आहे.

राव यांनी शिवलिंगाच्या दोन मुर्ती तयार केल्या आहेत. एक शिवलिंग बाटलीच्या आत साकारले असून, ते 0.5 इंच लांब आहे. तर तेवढ्याच आकाराचे शिवलिंग पेन्सिलच्या टोकावर देखील साकारले आहे.

एल ईश्वर राव हे ओडिसाच्या भुवनेश्वरपासून 20 किमी लांब जातनी गावात राहतात. राव यांनी सांगितले की, हे खूपच अवघड काम होते. चार सॉफ्ट स्टोनला बाटलीच्या आत बसवणे खूपच अवघड काम होते. यासाठी एकाग्रतेसोबतच सराव देखील असणे आवश्यक आहे.

याआधी राव यांनी विश्वचषकाच्या ट्रॉफीला पेन्सिलवर चिंचेच्या बियांपासून बनवले होते. मागील वर्षी बाटलीच्या आत त्यांनी चर्च देखील साकारले होते.

Leave a Comment