महिलेने स्फोटात गमवले होते दोन्ही हात, आज अनेकांसाठी ठरत आहे प्रेरणा

दोन्ही हात गमावल्यानंतर एखादी व्यक्ती निश्चितच खचून जाईल. मात्र एका महिलेने दोन्ही हात गमावल्यानंतर देखील आपल्या कर्तुत्वाने नाव कमवले आहे व आज इतरांसाठी प्रेरणा ठरत आहे. या महिलेचे नाव आहे मालविका अय्यर.

13 वर्षांची असताना ग्रेनेट विस्फोटामुळे तिले आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. मात्र यातून खचून न जाता तिने पीएचडी देखील पुर्ण केली. आज मालविका 30 वर्षांची आहे. 18 फेब्रुवारीला तिने आपल्या वाढदिवासनिमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट केली. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

मालविकाने लिहिले की, हॅप्पी बर्थडे टू मी…जेव्हा बॉम्बमुळे मला हात गमवावे लागले, त्यावेळी डॉक्टरांनी माझे प्राण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.  यावेळी माझ्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करताना काही चुका झाल्या.

मालविकाने पुढील लिहिले की, मात्र तिच चुक अविश्वसनीय ठरली. ते हाड माझ्या एकमेव बोटाप्रमाणे काम करते. व याच कारणामुळे मी टाईप करू शकते.

तिने लिहिले की, मी माझ्या पीएचडी थेसिस लिहिण्याचा आनंद साजरा केला व आता आपली वेबसाईट शेअर करण्यास उत्साही आहे. जिला मी आपल्या विलक्षण बोटाने तयार केले आहे.

मालविका 13 वर्षांची असताना 2002 मध्ये तिच्या हातात ग्रेनेटचा स्फोट झाला होता. त्यावेळी ती पालकांसोबत राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहत होती.

या घटनेनंतर अनेकजण तिला मदत करण्यासाठी पुढे आली. ती सध्या एका सामाजिक कार्यकर्ता आणि आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे.

2017 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मालविकाचा नारी शक्ती पुरस्कारने सन्मान करण्यात आला होता. मालविकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिच्याबाबत वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर तत्कालिन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी तिला राष्ट्रपती भवनमध्ये भेटायला बोलवले होते.

मालविकाने पुढील शिक्षण दिल्लीच्ये सेंट स्टीफन कॉलेजमधून केले. तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यात मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क येथून एमफिल आणि पीएचडी देखील केली.

Leave a Comment