घरी बसल्या एका क्लिकवर मतदान ओळखपत्रासाठी असा करा अर्ज

मतदान ओळखपत्राला आधारकार्डशी जोडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रस्तावाला कायदा मंत्रालया परवानगी देण्याची शक्यता आहे. मतदान ओखळपत्र आधारशी लिंक केल्याने बोगस मतदारांना यादीतून काढण्यात येईल व बोगस मतदानाला आळा बसेल असे सांगितले जात आहे. मतदान ओळखपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या देखील मतदान ओखळपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

मतदान ओखळपत्रासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे जन्म तारखेचा पुरावा म्हणून दोन प्रकारची कागदपत्र असणे आवश्यक असतात. ही कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतात. यामध्ये जन्मदाखला, 10वीचे प्रमाणपत्र, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधारकार्ड या कागदपत्रांचा समावेश आहे.

Image Credited – Amarujala

ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर सर्वात प्रथम नॅशनल वोटर सर्व्हिसेज पोर्टल (https://www.nvsp.in/) वर जावे. मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीसह रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करावे.

Image Credited – Amarujala

फॉर्म 6 निवडून, तो व्यवस्थित भरावा. राज्य आणि विधानसभा/लोकसभा मतदार क्षेत्राची निवड करावी. त्यानंतर नाव, वय, पत्ता अशी महत्त्वाची माहिती फॉर्ममध्ये भरावी.

Image Credited – Amarujala

यानंतर तुम्हाला लिंकसह एक ईमेल येईल. ज्याद्वारे तुम्ही मतदान ओखळपत्राचे स्टेट्स चेक करू शकता. मतदान ओखळपत्र मिळण्यासाठी जवळपास 30 दिवस लागू शकतात. तुम्ही वोटर हेल्पाईन अ‍ॅपद्वारे देखील मतदान ओखळपत्रासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment