ट्रम्प यांच्यासोबत भारतात येणार कन्या इवांका, जाणून घ्या तिच्याविषयी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत कन्या इवांका देखील येणार असल्याचे सांगितले जात आहे. इवांका याआधी देखील 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. इवांकाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

39 वर्षीय इवांका ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना यांची मुलगी आहे. इवांकाचा जन्म 30 ऑक्टोंबर 1981 ला मॅनहॅटन येथे झाला आहे. तिची आई एक अमेरिकन मॉडेल होती. सांगण्यात येते की, जेव्हा ट्रम्प आणि इवाना यांचा घटस्फोट झाला त्यावेळी इवांका केवळ 10 वर्षांची होती.

View this post on Instagram

Happy birthday Mama! ❤️

A post shared by Ivanka Trump (@ivankatrump) on

इवांका आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आईसोबतचे लहानपणीचे फोटो शेअर करत असते.

इवांकाने बिझनेस एक्झिक्यूटिव्ह, मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्ता अशी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. 15 वर्षांची असताना इवांकाने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक मोठमोठ्या ब्रँड्ससोबत काम केले.

Image Credited – Navbharattimes

इवांकाने 2009 मध्ये जेरेड कुशनरसोबत लग्न केले. जेरेड एक प्रसिद्ध प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. इवांका आणि कुशनर यांना 2 मुले आणि 1 मुलगी  आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात इवांकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. महिला मतदारांना आकर्षित करण्यास इवांकाची महत्त्वाची भूमिका होती, असेही सांगितले जाते.

इवांका 2017 मध्ये हैदराबाद येथे आयोजित जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी भारतात आली होती.

2005 मध्ये इवांकाने आपल्या दोन्ही भावांसोबत मिळून वडिलांचा उद्योग सांभाळला होता. तिने ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये एग्झिक्यूटिव्ह वॉईस प्रेसिडेंट हे पद देखील सांभाळले होते. मात्र ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर इवांकाने हे पद सोडत वडिलांची सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.