14 हजार फूट उंचीवर सुरू झाले देशातील पहिले आईस कॅफे

लद्दाखच्या 14 हजार फुट उंच लेह-मनाली नॅशनल हायवे वर देशातील पहिले आईस कॅफे सुरू झाले आहे. हे कॅफे लद्दाखच्या मीरु गावाच्या जवळ असून, याला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने चार स्थानिक युवकांसोबत मिळून तयार केले आहे. येथे मसाला चहा, जिंजर-टी, बटर-टी आणि मसाला मॅगी दिली जाते.

या कॅफेची कल्पना मॅकेनिकल इंजिनिअर सोनम वांगचूक यांच्या प्रोजेक्टपासून घेण्यात आलेली आहे. स्तूप बनविण्यासाठी पाईपची गरज असते. उंचीवरून येणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असतो. जेव्हा पाणी पाईपाच्या ठोकावर पोहचते, त्यावेळी स्प्रेमधून बाहेर पडत हिवाळ्यात गोठले जाते. याप्रकारे तेथे एक कोनाच्या आकाराचे एक स्तूप तयार होते. या कॅफेला देखील असेच तयार करण्यात आले आहे.

Image Credited – Bhaskar

कोनाच्या आकाराच्या या स्ट्रक्चरवर पाणी टाकले जाते, जेणेकरून यावर बर्फाचा एक थर तयार होतो. या कॅफेमध्ये बसून व्यक्ती चहाचा आनंद घेऊ शकतो एवढी जागा आहे.

Image Credited – Bhaskar

कॅफेला पर्यावरण पूरक बनविण्यात आलेले आहे. पर्यटक मे 2020 पर्यंत या कॅफेला भेट देऊ शकतात. त्यानंतर हे कॅफे विरघळण्यास सुरूवात होईल. पाणी वाया जाऊ नये, यासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बर्फ विरघळल्यानंतर पाण्याला जमा केले जाईल व त्याचा सिंचनासाठी वापर केला जाईल.

Leave a Comment