पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिल्लीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी ‘ज्यूनिअर ज्यूडिशियल असिस्टंट’ पदासाठी भरती होत आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2020 आहे. अर्जाचे शुल्क जनरल, ओबीसी-एनसीएल आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये आहे, तर इतर वर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये आहे.

132 पदांपैकी 36 पदे हे जनरल वर्गातील उमेदवारांसाठी आहेत. तर ईडब्ल्यूएससाठी 21, ओबीसी 33, एससी 26 आणि एसटी वर्गातील उमेदवारांसाठी 16 पदे आहेत.

इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे, तसेच त्याचा टायपिंग स्पीड प्रति मिनिट 35 शब्द असणे गरजेचे आहे. जनरल वर्गातील उमेदवाराचे किमान वय 18 आणि कमाल वय 27 वर्ष असणे गरजेचे आहे. इतर वर्गातील उमेदवारांना वयात सूट मिळेल.

इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहितीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट http://delhihighcourt.nic.in/ ला भेट देऊ शकतात.

Leave a Comment