हा हुकुमशहा प्रजेसाठी होता भगवान


फोटो सौजन्य कॅच न्यूज
जगात अनेक हुकुमशहा होऊन गेले आणि त्यांच्या क्रौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात. काही देशातील हुकुमशहा मात्र प्रजेसाठी भगवान होते. त्यातील एक आहे तुर्कमेनिस्थानचा माजी राष्ट्रपती सपरमुरान नियानोव. हा हुकुमशहा सणकी होताच, त्याने अनेक विचित्र नियम केले पण देशातील नागरिकांना त्याने अनेक गोष्टी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याने काराकुलम वाळवंटात मानवनिर्मित विशाल सरोवर, सरू जंगल उभारले, राजधानीच्या बाहेर बर्फाचा महाल, स्की रिसोर्ट व १३० फुट उंचीचा पिरामिड बांधला होता. त्याने देशभर स्वतःचे सोन्याचे पुतळे उभारले होते.

नियानोव याचा जन्म १९ फेब्रुवारी ४० सालचा. त्याने तुर्कमेनीस्तानवर १५ वर्षे राज्य केले. सोविएत युनियनचे तुकडे पडल्यावर तुर्कमेनिस्तान स्वतंत्र झाले १९९१ मध्ये. तेव्हा पासून नियानोव राष्ट्रपती होता. त्याचे वडील रेड आर्मीत होते आणि लढताना मरण पावले. त्याची आई आणि दोन भाऊ अश्गाबत येथील भूकंपात मरण पावले. त्यामुळे तो अनाथालयात वाढला होता. त्याने १९६७ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविली होती. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक विचित्र नियम केले होते.


त्याने स्वतःला आजीवन राष्ट्रपती जाहीर केले होते. त्याने महिन्यांची नावे बदलून ती स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरून ठेवली होती. युवकांनी दाढी आणि केस वाढविण्यावर त्याने बंदी घातली होती. नागरिकांनी तोंडात बसविलेले सोन्याचे दात काढून टाकावेत असा आदेश त्याने दिला होता. तसेच त्याच्याविरुद्ध बोलणारयाना तो घराबाहेर पडू देत नसे. मीडियावर त्याचे पूर्ण नियंत्रण होते. ओपेरावर बंदी होती. तसेच गाडीत रेडीओ ऐकणे, लग्न समारंभात संगीतावर बंदी होती.

१९९७ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्याला धुम्रपान सोडावे लागल्यावर त्याने मंत्री तसेच देशात सार्वजनिक जागी धूम्रपानास बंदी घातली. तसेच त्याने एक विशाल मशीदही बांधली होती.

Leave a Comment