या वाळवंटात आहेत देवाची पाउले


फोटो सौजन्य कॅच न्यूज
दक्षिण पश्चिम आफ्रिकेत अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याला लागून असलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि सर्वात प्राचीन वाळवंट आहे नामिब वाळवंट. याचा भूभाग मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची आठवण करून देतो. वाळूचे डोंगर, उघडेबोडके पहाड असलेल्या या वाळवंटाची व्याप्ती ८१ हजार चौरस किमी आहे. हे वाळवंट ५ कोटी ५० लाख वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या वाळवंटाची सीमा तीन देशाशी लागून आहे. जगातील सर्वात जुने मानले जाणारे सहारा वाळवंट २० ते ७० लाख वर्षे जुने आहे.


नामिब वाळवंटात दिवसा तापमान ४५ डिग्रीवर जाते तर रात्री बर्फासारख्या थंडगार असतात. त्यामुळे येथे राहणे शक्य नाही. तरीही अनेक प्रजाती येथे राहतात. येथे वर्षाला २ मिमी पाउस पडतो. कधी तोही पडत नाही. येथे अनेक जातीची हरणे, चित्ते, शहामृग, झेब्रा असे प्राणी दिसतात. या भागात व्हेल माशांचे सांगाडे आणि तुटलेल्या जहाजांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडतात. हे एक मोठे गुढ आहे. त्याचबरोबर येथे गोल गोल असे लाखो घेरे दिसतात. त्यात विशिष्ट प्रकारचे गवत उगवते. येथे विशिष्ट प्रकारचे ठसे दिसतात त्याला स्थानिक लोक त्यांचा देव मुकुरू याच्या पायाचे ठसे मानतात. हे ठसे आत्मे बनवितात असा त्यांचा विश्वास आहे.

Leave a Comment