जॉर्जटाऊन मध्ये कुत्रा बनला महापौर


फोटो सौजन्य भास्कर
अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील जॉर्जटाऊन येथे पार्कर डॉग म्हणजे धुव्रीय कुत्रा महापौर बनला आहे. त्याची निवड बोर्ड सदस्यांनी मतदान करून केली. बुधवारी जॉर्जटाऊन कम्युनिटी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात महापौरपदाची औपचारिकता पूर्ण केली गेली. पार्करला पोलीस व जज केल्सी यांनी शपथ दिली.

या कार्यक्रमाला स्थानिक तसेच श्वानप्रेमी उपस्थित होते. महापौर पदाची शपथ घेण्यासाठी पार्कर टाय, कॅप, चष्मा अश्या फुल ड्रेस मध्ये आला होता. या सोहळ्याचे फोटो क्लिअर क्रिक कौंटीच्या फेसबुक पेजवर शेअर केले गेले आहेत. इन्स्टाग्रामवर पार्कर स्नो डॉग नावाचे त्याचे अकौंट असून त्याचे १६८०० फॉलोअर् आहेत. पार्कर महापौर जबाबदारी सांभाळेल तसेच तो लवलँड स्की एरियाचा शुभंकर आहे. तो रॉकी माउंटनच्या एका गावात थेरपी कॅम्प मध्ये सेवाही देतो.

Leave a Comment